बांबवडे

-निर्मल ग्रामपंचायत-

बांबवडे,

ता. पलूस, जि.सांगली.

 प्रस्तावना-

निर्मलग्राम ग्रामपंचायत, बांबवडे.

  • बांबवडे गावचा पूर्व इतिहास उपलब्ध नसलेने सांगी वांगी वृध्द व्यक्तींच्या चर्चेतून मिळालेल्या माहितीवरुन पूर्वी इ.स. 800 च्या दरम्यान गोळक ब्राम्हण लोकांची सध्या बांबवडे गावाच्या उत्तरेस असणारे तलावाजवळ वसाहत होती. त्याठिकाणी आसपास काळी जमिन असताना सुध्दा पांढरी मातीचा भाग अस्तित्वात आहे.
  • त्याठिकाणी खोदले असता मडकी आजही सापडतात. शिवाय तलावाच्या आतमध्ये पिण्याच्या पाण्याची विहीर सापडलेली दिसून आली. यावरुन गोळक ब्राम्हण यांची वस्ती होती. हे दिसून येते अंदाजे इ.स. 900 च्या दरम्यान संकपाळ लोक आले. गोळक ब्राम्हणांच्या लोकांमध्ये बरेच दृष्टीहीन लोक होते. त्यांना तिर्थक्षेत्री जायचे होते. तिर्थक्षेत्री पोचविणेच्या बदल्यात संकपाळ यांनी ब्राम्हण वस्तीचा कबजा घेणेचे ठरले. त्यांना तिर्थक्षेत्री त्याप्रमाणे संकपाळ लोकांनी ब्राम्हण वाडीऐवजी बांबवडे असे नाव धारण केले त्याचा अपब्रंश होवून त्याचे नांव बांबवडे असे नाव रेकॉर्ड सदरी पडले.