माझे गाव
- बांबवडे गाव कराड-तासगांव महामार्गावर व सातारा अंथणी लक्षकरी रस्ता लगत वसले आहे. पूर्वी बांबवडे गाव सांगली संस्थानमध्ये होते. त्यावेळी मिरज प्रांत तालुका, जि. दक्षिण सातारा असे होते. त्यानंतर स्वातंयानंतर संस्थान खालसा होवून बांबवडे गाव तासगाव तालुक्यात विलीन झाले. सध्या हे गाव पलूस तालुक्यात आहे. पलूस तालुका गावापासून आमचे गाव पाच किमी. अंतरावर आहे. किर्लोस्करवाडी स्टेशन पासून 10 कि.मी. पूर्वेस आहे. वभिलवडी रेल्वे स्टेशनपासून उत्तरेस 10 कि.मी. अंतरावर आहे.
- गावात प्रथम पवार / संकपाळ आले. गोलक लोकांना हुस्काऊन लावलेनंतर पाटिलकी / संकपाळ यानि वाटुन घेतली. कालांतराने पवार / संकपाळ सोयरीक झाले. त्या नंतर दोन लक्ष्मामध्ये पाटिलकी होती. सर्वसाधारण संकपाळ २५%, ४५% पवार व ३० % इतर. असे सर्व एकूण लोकसंख्या 6403 आहे. गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहे.
- पूर्वी हे गांव डुबल घराण्याकडे चौथाई सरदेशमुखी होती. ती चौथाई सरदेशमुखी तात्यासाहेब पटवर्धन सांगली संस्थानचे राजे यांनी चौथाई सरदेशमुखी खालसा केली. संस्थान खालसा होईपर्यंत त्याबदल्यात त्या कुंटूबांना वार्षिक अनुदान मिळत होते. संकपाळ-पवार पाटीलकीचा करार डुबलांचे बुरुजापुढे नरसोबा मंदीरासमोर करार पूर्ण झालेला पुरावा आजही मिळतो. गावाची ग्रामपंचायत स्थापना सन 1954 झाली. पहिले ग्रा.पं. सदस्य 9, दुस-यांदा 11, तिस-यांदा 13 सदस्य पुढील चार निवडणुकी मिळते.
7ads6x98y