माहिती
स्वच्छता:-
- स्वच्छतेसाठी नेहमीच गाव आग्रही असते.
- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात गावाने सातत्याने भाग घेतला आहे.
- ग्राम पंचायतीच्या वतीने वेळोवेळी गावात स्वच्छता मोहिम राबविली जाते.
- पावसाळयात डासांचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी औषण फवारणी केली जाते.
- त्याप्रमाणे नागरिकांना पिण्याच्या पाण्यातून पावसाळी आजाराची लागण होवू नये यासाठी ब्लिचिंग पावडर फवारणी जाते.
- तसचे प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा त्यांचा परिसर स्वच्छ करतात.
प्राणीसंपदा-
- गावात शेतीबरोबर दूध व्यवसाय व पोल्ट्री हा जोडधंदा केला जातो. त्यामुळे गावात संकरीत गाय दिल्ली, मुराम्हैस, बॉयलर पक्षी, अंडयावरील पक्षी यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी औदयोगिक स्टील फेब्रीकेटर्स सारखे उदयोग उभे केले आहे. गावातील अनेक तरुण देशाच्या अन्य भागात गलाई व्यवसायिक म्हणून विखरले आहेत.
जलस्त्रोत-
- गावाच्या दक्षिण बाजूस 10 कि.मी. अंतरावर कृष्णा नदीवरुन लिफट इरिगेशन आणले आहे.
- गावाच्या उत्तरेस 2 कि.मी. अंतरावरुन येराळा नदीवरुन लिफट आणले आहे.
- तसेच गावात विहीरी 365 आहेत बोअर संख्या 147 आहे.
- गावाला ग्रामपंचायतीने सन 1966-67 मध्य ग्रा.पं. ने स्वतंत्र विनाअनुदान ग्रा.पं. माफर्त नळपाणी पुरवठा योजना पूर्ण केली.
- तसेच सन 1967-68 साठी शेतीच्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करणेत आले. त्यापैकी येरळा नदीवरील 300 एकर जमिन ओलीताखाली आणण्यासाठी स्किम पूर्ण केली.
- कृष्णा नदीवरील उपसा जलसिंचन कामी पाणीपुरवठा मिळालेने व 1972 साली दुष्काळ पडलेने धडक योजनेत सामिल झाले. त्याप्रमाणे स्किम चालू आहे.
पीक-फळबागांची:-
- गावात प्रमुख व्यवसाय शेती आहे. खरीप, रब्बी पिकाबरोबर पालेभाज्या हे उत्पादन केले जाते.
- तसेच द्राक्षविक्रीसाठी बांबवडे गाव प्रसिध्द आहे.
- गावातील शेतकरी हा आधुनिक शेतीची कास धरुन पारंपारिक पिकांबरोबर द्राक्षे हे पीक मुख्य म्हणून गावातील तरुण या द्राक्ष शेतीकडे वळला आहे.
- व द्राक्ष पिक हे मुख्य मानले जात आहे. त्याबरोबर इतर फळे उत्पादन केली जात आहेत व द्राक्षेपासून बेदाणा निर्मिती केली जात आहे.





