व्यक्तिमत्वे

राजकीय व्यक्तिमत्वे-

  • कै. भगवान ज्ञानोबा पाटील-यांनी 15 ऑगस्ट 1907 च्या स्वातंयानंतर या गावात विधायक काम करण्याची जी चळवळ उभी राहीली ती त्यांचे नेतृत्वाने ग्राम सुधारणेबाबत त्यांची काही निश्चीत धारणा होती. महात्मा गांधी ग्राम स्वच्छता सप्ताहात भाग घेवून रस्त्याकडेला दगडी गटर बांधून श्रमदानातून काम केले.
  • कै. शंकरकाक उर्फ़ ग.बा. पाटील:- भगवान आण्णांच्या स्वर्गवासानंतर शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रेसिडेंट पदाची धुरा त्यांच्याच अंतिम इच्छेनुसार कै. शंकरकाका उर्फ़ ग.बा. पाटील यांच्याकडे आले अत्यंत समर्थपणे त्यांनीही जबाबदारी आपल्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत सांभाळली ते धाडसी व करारी बाण्याचे गृहस्थ होते केवळ बांबवडे गावात नव्हे संपूर्ण तासगाव तालुक्यात ते प्रभावशाली असे नेते होते. तालुक्यातल्या अनेक संस्थांचे नेतृत्व त्यांनी केले 1972 ते 1979 शिक्षण संस्थाच्या जिल्हयातील संघटनेचे प्रमुख घटक होते व ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते.
  • कै. रामचंद्र तुकाराम भोसले:- शिक्षण प्रसारक मंडळाचे नौका समर्थपणे चालविणारे कै. भगवान आण्णा, महीपती बापू आणि कै. शंकरकाका यांना समर्थपणे आयुष्यभर साथ देणारे पोलादी पुरुष म्हणून कै. रामचंद्र तुकाराम भोसले यांचा आवजूर्न उल्लेख करावा लागेल. ते कर्मवीर भाऊराव आण्णांच्या रयत शिक्षण संस्थेत इंटरसायन्स पर्यंत शिक्षण घेत असेलेने कै. भोसलेसर केवळ गावच्या शिक्षण संस्थेत काम करणेसाइी व जनता विदयालयाची जबाबदारी झेलण्यासाठी शिक्षण सोडून आले. कै. कर्मवीरांची सर्व संस्कार त्यांनी आत्मसात केले व त्यांनी नामवंत विदयार्थी घडविण्याचे काम केले.
  • श्री नारायण बाजीराव संकपाळ- स्वातंय सैनिक- दि. 24/3/69 पासून दि 24/5/81 पर्यंत व दि 23/12/92 पासून ते दि. 23/12/97 पर्यंत सरपंच पदांची धुरा सांभाळली व थोर क्रांतीकारक पुरोगामी विचारवंत बांबवडे भूषण स्वा. सै. ते डाव्या विचारसरणीचे एक आगळेवेगळे व्यक्तीमत्व आहे. कै. नाना पाटील व क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापना झालेल्या तुफान सैनिक ‘गिल्बर्ट’ म्हणून ख्यातनाम झालेल्या व स्वातंयवीर चळवळीमध्ये नेहमी अग्रेसर राहिला स्वातंयनंतरच्या विधायक कामामध्ये हिरीरीने भाग घेवून बांबवडे गावातील जन्मभर जडणघडण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच कुस्त्याच्या मैदानावर नामांकित पैलवान म्हणून नाव कमविले.
  • कै. भाई दत्ता पवार:- पुरोगामी चळवळ पुरोगामी विचारसरणी यामध्ये बांबवडे गावास पश्चिम महाराष्ट्रात नावारुपास आणणारे व वैचारीक राजकारणामध्ये गावाचा चेहरा मोहरा बदलून त्याला आधुनिक वळण देणारे शिल्पकार म्हणून भाई दत्ता पवार यांचा स्विकार करावाच लागेल. तसेच एक विद्रोही बंडखोर म्हणून त्यांची प्रतिमा होती 15 ऑगस्टच्या कुस्ती मैदानाचे संयोजन करण्यामध्ये दीर्घकाल त्यांनी हिरीरीने भाग घेतला शे.का.प. पक्षाचे विभागीय सरचटणीस म्हणून काम केले सांगली जिल्हयातील तमाम विरोधी पक्ष कार्यकत्र्यांचे एक प्रमुख आश्रयस्थान म्हणून त्यांनी आपली कामगिरी बजावली.
  •  श्री. शिवाजीराव कृष्णा डुबळ उफर् दाजी:- ग्रामपंचायतीचे विरोधी आघाडीचे पहिले सरपंच झाले. ते 24 मार्च 1969 पर्यंत होते त्यांच्या धडपडणा-या उदयोगी स्वभावामुळे त्यांनी गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी काही खूप चांगल्या गोष्टी केल्या त्यांचे शिक्षण एसएससी पर्यंत झाले व ते वाहन व इंजन विशेषत: ट्रक्टर इंजन दुरुस्तीमध्ये एक अत्यंत कुशल तंत्रज्ञ होते पण सरपंच पद स्विकारल्यानंतर गावच्या भल्यासाठी जम बसलेल्या आपल्या धंदयाकडे त्यांनी दुर्लक्ष केले व गावाच्या विकासाचा ध्यास घेतला लोकांना पिण्याच्या पाण्याची घरपोच सेवा नळपाणी पुरवठा स्कीम केली त्यांनी गावात वीज पुरवठेची सोय केली. वेरळामाई उपसा जलसिंचत योजना सर्वांच्या सहकार्याने पूणे केले व सध्या गावात तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात.
  • कै. स्वातंय सैनिक जयसिंग तातोबा पवार- राजकारण व समाजकारण स्वत:च्या मिळकतीसाठी धंदा म्हणून करायचे नसते तर घरप्रपंचाचा विचार न करता समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो त्यातून उतराई होण्यासाठी करायचे असते या विचाराने भारावलेल्या कार्यकत्र्यांपैकी एक म्हणजे कै. स्वा. सै. जयसिंग आण्णा पवार ते नेता कधीच नव्हते. कायम कार्यकर्तेच होते. दि. 25/5/1981 ते 23/1/1987 पर्यंत सरपंच पद भुषविले होते.
  • कै. शिदू यशवंत पवार:- हे दि. 23/1/87 ते 22/12/92 या काळात सरपंचपदी होते. त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या हीतासाठी व त्यांची जपणूक करण्यासाठी बराच काळ खर्ची घातला ते धार्मिक प्रवृत्तीचे होते त्यांच्या काळात विठ्ठल रुक्मणी व हनुमान मंदीराचे जीर्णोध्दाराचे काम त्यांनी केले तसेच सिध्देश्वर मंदीराच्या कपाडी व कळसाचे काम पूर्ण केले प्राथमिक शिक्षण शाळेचे काम त्यांनी स्वखर्चाने केले. त्यांना कुस्तीचा नाद असल्यामुळे 15 ऑगस्ट निमित्त भरणा-या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीचे बक्षिस तात्या मोठया उत्साहाने देत होते.
  • कै. भानुदास पांडुरंग पवार:- बांबवडे गाव ज्यांना कधी विसरु शकणार नाही असे एक व्यक्तिमत्व म्हणजे कै. भानुदाव पवार होय. अक्षरश: शुन्यातून विश्व निर्माण करुन झिरो मधून हिरो झालेला हा शिल्पकार अनेक व्यक्तींना, मित्रांना व सहका-यांचाही शिल्पकार होता व ते जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक, व्हा. चेअरमन व चेअरमन पदी काम केलेले आहे. ते ट्रक्टर ड्रायव्हर तसेच एस.टी ड्रायव्हर म्हणून नोकरी करणारे आबा नावाजलेले द्राक्ष बागायतदार झाले. एक नामांकित पैलवान म्हणून गाजलेले आबा 15 आॅगस्ट कुस्ती मैदानाचे प्रमुख आधारस्तंभ होते नवादित कुस्तीगीरांचे अक्षयस्थान होते गावात त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखा काढून तेथील लहा लहान उदयोजकांना सत्वर अर्थ पुरवठा करणारे कै. आबा गोरगरिबांचे आर्थिक मदतगार होते.
  • श्री. मारुती ज्ञानू पाटील- बांबवडे वि.का.स. सोसायटीची स्थापना झाल्यानंतर आठदहा वर्षांनी या संस्थेची धुरा कै. शंकर कांकानी मारुती आप्पाकडे सोपवली वयाने तरुण असणा-या आप्पांनी सहकारी चळचळीचा उद्देश मनोभावे समजून घेतला आणि या संस्थेच्या लहानशा धारेचे रुपांतर विशाल प्रवाहामध्ये करुन दाखविले. संस्थेची भव्या आणि विशाल इमारत ही त्यांच्या कामाची पहिली निर्मिती आहे. सिध्देश्वर दूध संस्थेची स्थापना त्यांनीच केली. सहकारी मळणीमशीन, पीठाची गिरणी, शेतीला लागणारी अवजारे द्राक्षबागेवर औषध फवारणीसाठी लागणारे पंप, सहकारी तत्वावर त्यांनीच आणले. सन 1965 पासून 20-22 वर्षे अखंडपणे काम करुन दीर्घकाळ चेअरमन पद सांभाळले.
  • लक्ष्मण निवृत्ती पाटील- सन 1968 पासून सन 2000 पर्यंत जवळजवळ 32 वर्षे एकाच सेवा संस्थेमध्ये संचालक व्हा. चेअरमनव चेअरमन म्हणून काम करणारे लक्ष्मणतात्या हे सांगली जिल्हयातील गावपातळीवरचे एकमेव उदाहरण असेल. औषध विभाग, किराणा बाझार इ. नवीन विभाग सुरु करुन सामान्य सभासदांचे हित जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सर्वांचे उत्तम सहकार्य मिळवून पलूस तालूक्यातील प्रथम क्रमांकाची सोसायटी म्हणून बक्षिस मिळविले. लक्ष्मण पाटील हे सन 1985 पासून 2003 पर्यंत 18 वर्षे बांबवडे गावचे पोलीस पाटील होते. या क्षेत्रांतही त्यांनी आपली जबाबदारी अतिशय उत्तमपणे पार पाडली सत्संगाच्या माध्यमातून प्रेमाने थबथबलेला समाज निर्माण करण्यासाठी धडपडणारा व माणसात दडून बसलेला ईश्वर शोधणारा एक चरणदास आहे. समाजजीवनाला आदर्श वळण लागण्यासाठी धडपडणारा असला पोलीस पाटील सहकारी संस्थेतला आदर्श कारभारी, उत्तम शेतकरी आणि आदर्श पती आदर्श पिता दीर्घकाळ अतिसहवासात असल्यामुळे त्यांचे मोल आपल्या लक्षात येत नाही पण बांबवडे गावाचा एक शिल्पकार म्हणून त्यांचा उल्लेख केल्याशिवाय गावाचा इतिहास पूर्ण होणार नाही.